अधिकाऱ्यांची कर्तव्ये

अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कर्तव्ये

अनु. क्र.

पद

कर्तव्ये

1.

 

संचालक

1. खाते प्रमुख आणि सरकारचे पदसिध्द संयुक्त सचिव.

2. खात्याच्या सर्व कामांचे प्रभारी व प्रशासकीय नियंत्रण.

3. आरेखन आणि वितरण अधिकारी आणि वित्तीय अधिकार प्रदान नियम 2008 च्या नुसार खाते प्रमुखांना दिलेले वित्तीय अधिकार

4. भाषा विकास संस्थांवर नियंत्रण

5. कायद्यानुसार या पदासाठी निर्धारित केलेली इतर सर्व कर्तव्ये.

2.

 

सहाय्यक संचालक (कोंकणी)

1. कोंकणी विभागाचे प्रभारी आणि एकंदरीत कामावर देखरेख.

2. देवनागरी लिपितील राजभाषेचा प्रसार आणि विकास.

3. राजभाषा कायदा आणि भाषा धोरणांची अंमलबजावणी.

4. “राजभास प्रशिक्षण येवजण” योजना – सर्व तालुक्यांत प्रशिक्षण देण्यासाठी समन्वयक

5. “भाषा विकास योजना” आणि “भाषा पुरस्कार योजनेची” अंमलबजावणी

6. समन्वयक – कायम प्रशिक्षण केंद्र

7. कोंकणी भाषेतून विविध शब्दावली तयार करणे (नवीन माहिती)

8. जन संपर्क अधिकारी

9. सार्वजनिक माहिती अधिकारी म्हणून माहिती हक्क कायद्याची अंमलबजावणी

10. वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेले इतर कोणतेही काम.

 

3.

 

सहाय्यक संचालक (मराठी)

1. मराठी विभागाचे प्रभारी आणि एकंदरीत कामावर देखरेख.

2. मराठी आणि इतर भाषांचा विकास.

3. राजभाषा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सल्लागार मंडळ

4. राजभाषा कायद्याशी संबंधित धोरणांची अंमलबजावणी.

5. इंग्रजीतून कोंकणी, मराठी, हिंदी आणि पोर्तुगीज भाषेत आणि इतर स्रोत भाषांमधून लक्ष्य भाषामंध्ये अनुवाद करण्यासाठी भाषांतरकाराचे पॅनल तयार करण्याबाबत.

6. राजभाषेतून प्रकाशन योजनेची अंमलबजावणी.

7. “अक्षर मित्र योजनेची” अंमलबजावणी

8. महिला कर्मचारीवर्गाचे कल्याण.

9. वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेले इतर कोणतेही कामे

 

4.

 

वरिष्ठ भाषांतरकार (कोंकणी)

  1. विधानसभेचे प्रश्न/राज्यसभेचे प्रश्न/लोकसभेचे प्रश्न यांचा विविध सरकारी खात्यांमधून आलेल्या कागदपत्रांचा, देवनागरी टंकलेखनाचा वापर करून, कोंकणीतून इंग्रजीमध्ये व इंग्रजीतून कोंकणीमध्ये भाषांतर करण्याचे कामकाज पाहणे.
  2. कोंकणीतून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीतून कोंकणीमध्ये केलेल्या भाषांतराचे मुल्यांकन व अभिप्रमाणीत करण्याचे कामकाज पाहणे.
  3. राजभाषेचा प्रसार व विकासांतर्गत नवीन योजना प्रस्तावित/तयार/सहाय्य करणे.
  4. खात्याने नेमलेल्या कोंकणी भाषांतरकारांसाठी व इतर नवोदित भाषांतरकारांसाठी कार्यशाळा आयोजित करणे व विकसित करणे.
  5. निवडणुकीसंबंधीत कामकाज कोंकणीतून करण्यासाठी निवडणूक कार्यालयाला साहाय्य करणे.
  6. राजभाषेच्या अंमलबजावणीसाठी व प्रसारासाठी विविध विषयांवर कार्यशाळा/परिसंवाद आयोजित करणे.

5.

 

वरिष्ठ भाषांतरकार (मराठी)

  1. विधानसभेचे प्रश्न/राज्यसभेचे प्रश्न/लोकसभेचे प्रश्न यांचा विविध सरकारी खात्यांमधून आलेल्या कागदपत्रांचा देवनागरी टंकलेखनाचा वापर करून मराठीतून इंग्रजीमध्ये व इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतर करण्याचे कामकाज पाहणे.
  2. मराठीतून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीतून मराठीमध्ये केलेल्या भाषांतराचे मुल्यांकन व अभिप्रमाणीत करण्याचे कामकाज पाहणे. राजभाषा कायद्याच्या धोरणांची अंमलबजावणी करणे.
  3. राजभाषा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार मंडळाचे कामकाज पाहणे.
  4. इंग्रजीतून कोंकणी, मराठी, हिंदी व पोर्तुगिज भाषांमध्ये आणि इतर स्रोत भाषांमधून लक्ष्य भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी  भाषांतरकारांचे पॅनल तयार करण्यासंबंधी कामकाज पाहणे.
  5. राजभाषेतून प्रकाशन योजनेचे कामकाज पाहणे.
  6. संस्कृत भाषेच्या प्रसारासाठीच्या योजनेचे कामकाज पाहणे.

6.

 

कनिष्ठ भाषांतरकार (कोंकणी)

  1. देवनागरी टंकलेखनाचा वापर करून कोंकणीतून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीतून कोंकणामध्ये भाषांतर करण्याचे काम.
  2. राजभाषा कायद्यासंबंधी धोरणांची अंमलबजावणी करणे.
  3. कोंकणी भाषेत परिभाषा तयार करण्यासंबंधीचे कामकाज.
  4. ‘राजभाषा प्रशिक्षण येवजण’ योजनेची अंमलबजावणी करणे.
  5. राजभाषेच्या अंमलबजावणीसाठी व प्रसारासाठी विविध विषयांवर कार्यशाळेसंबंधी कामकाज.
  6. कोंकणी व इतर भाषांसाठीच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संबंधीचे कामकाज.

7.

 

कनिष्ठ भाषांतरकार (मराठी)

  1. देवनागरी टंकलेखनाचा वापर करून मराठीतून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतर करण्याचे काम.
  2. राजभाषा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार मंडळाचे कामकाज पाहणे.
  3. खात्याने नेमलेल्या भाषांतरकारांसाठी व इतर नवोदित भाषांतरकारांसाठी कार्यशाळा आयोजित करणे.
  4. राजभाषेच्या अंमलबजावणीसाठी व प्रसारासाठी विविध विषयांवर कार्यशाळा/परिसंवाद आयोजित करणे.
  5. भाषिक अल्पसंख्यांकांच्या मुद्यांसहित भारत सरकारच्या पत्रव्यवहारासंबंधी कामकाज पाहणे.
  6. मराठी व व इतर भाषांसाठीच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संबंधीचे कामकाज पाहणे.

8.

 

कनिष्ठ भाषांतरकार (हिंदी)

  1. देवनागरी टंकलेखनाचा वापर करून हिंदीतून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीतून हिंदीमध्ये भाषांतर करण्याचे काम.
  2. केंद्र सरकारच्या पत्रव्यवहारासंबंधी कामकाज.
  3. खात्याने नेमलेल्या भाषांतरकारांसाठी व इतर नवोदित भाषांतरकारांसाठी कार्यशाळा आयोजित करणे.
  4. भाषिक अल्पसंख्यांकांच्या मुद्यांसहित भारत सरकारच्या पत्रव्यवहारासंबंधी कामकाज पाहणे.

9.

मुख्य कारकून

1. एकंदरीत प्रशासनाची देखरेख.

2. सरकारतर्फे वेळोवेळी जारी करण्यात येणार्‍या परिपत्रकांतील/आदेशांतील नियमांची किंवा प्रशासकीय नियमांची  पाहणी करणे आणि उच्च अधिकार्‍यांच्या निर्देशास आणून देणे.

3. पदांची निर्मिती, भरती, पुन:प्रवर्तन, नवीन नियुक्ती, बढती, नोकरी कायम करणे, नवीन पदांसाठीच्या भरती नियमांची रचना इ. बाबींची देखरेख.

4. विधानसभेचे प्रश्न / राज्यसभेचे प्रश्न / लोकसभेचे प्रश्न इ. ना उत्तरे देणे, अस्थायी समिती यासारख्या विधानसभीय व्यवहारांची देखरेख.

5. कर्मचार्‍यांच्या हजेरीचे नियंत्रण, वैयक्तिक फाईल, सेवा पंजी/नोंदी इ. सहित कर्मचार्‍यांच्या सर्व व्यवहारांची देखरेख.

6. इतर खाती/सचिवालयातील खाती यांच्याशी फाईल्स व इतर प्रलंबित व्यवहारांबाबतचा पाठपुरावा करणे व संपर्क ठेवणे.

7. वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोपविलेले इतर कोणतेही कार्य. 

 

10.

 

लेखापाल

1. लेखा संबंधी सर्व व्यवहारांची एकंदरीत देखरेख.

2. विविध लेखा/वित्तीय नियमांची किंवा सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकांतील/आदेशांतील नियमांची पाहणी करणे.

3. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक, पुनर्विनियोग, पुनर्प्रदान, पुरक अनुदान आणि नियोजन व अनियोजनांतर्गत बचत स्वाधीन करणे, ताळमेळ बसविणे इ. बाबतचे व्यवहार हाताळणे.

4. अनुदानाच्या प्रस्तावांची व खर्चाची छाननी करणे, लेखापरिक्षीत विधान, ताळेबंद व विनियोग प्रमाणपत्र यांची तपासणी/पडताळणी करणे.

5. लेखा तपासनीसांच्या आक्षेपांवरील सुधारणांचा आढावा घेणे आणि लेखाचपासनीसांच्या निरीक्षण अहवालाबाबतचे व्यवहार पाहणे.

6. लेखा खात्याला सादर करण्यापूर्वी वेतन बिले, एफव्हीसी बिले आणि इतर सर्व प्रकारची बिले यांची पडताळणी करणे.

7. खात्यातील कर्मचार्‍यांच्या टीडीएस बाबतचे व्यवहार पाहणे व फॉर्म 16 जारी करणे.

8. खरेदी समितीचे काम पाहणे.

9.  वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोपविलेले इतर कोणतेही कार्य. 

 

 

11.

 

वरिष्ठ श्रेणी कारकून

1. प्रशासकीय पत्रव्यवहार

2.  पदांची निर्मिती, पुन:प्रवर्तन, नवीन पदांसाठी भरती नियमांची रचना करणे, नोकरीत कायम करणे व बढती इ. संबंधी व्यवहार.

3. स्थायी सूचना, कामाचे विभाजन, अंतर्गत बदल्या आणि पदनियुक्ती.

4. स्टाफच्या निवृत्तीवेतनाचे व्यवहार पाहणे आणि रुजू होण्याची तारीख, जन्मतारीख, वयोमानाप्रमाणे निवृत्तीची तारीख, स्वेच्छानिवृत्तीची तारीख, मृत्यूची तारीख इ. संबंधीच्या माहितीची नोंद ठेवणे.

5. वार्षिक पगारवाढ, एमएसीपी, डीएसीपी इ.च्या अनुदानाबाबतचे व्यवहार पाहणे.

6. स्टाफ सदस्यांच्या  वैयक्तिक फाईल्स, सेवा पंजी, रजा नोंदी व इतर सेवा व्यवहार पाहणे.

7. स्टाफची हजेरी व रजा नोंद हाताळणे आणि बायो-मॅट्रिक मासिक हजेरी अहवाल सादर करणे.

8. विधानसभेचे प्रश्न/राज्य सभेचे प्रश्न/लोकसभेचे प्रश्न यांची उत्तरे तयार करणे.

9. संगणक, प्रिंटर, फॅक्स मशिन, झेरॉक्स मशिन, बायो मॅट्रिक मशिन, फोन, मोबाईल, फर्निचर व फिक्स्चर, उपकरणे, वाहने व इतर संबंधित वस्तूंची खरेदी व देखरेख आणि एएमसी व नामंजुरी/स्क्रॅपिंगचे व्यवहार पाहणे.

10. विविध खात्यांकडून प्राप्त झालेली पत्रे, पत्रव्यवहार हाताळणे.

12.

 

कनिष्ठ लघुलेखक/संचालकांचे वैयक्तिक सचिव

1. संचालकांचे वैयक्तिक सचिव, वैयक्तिक व्यवहारांसहित संचालकांचे सर्व व्यवहार, देवनागरी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये, श्रुतिलेखन व टंकलेखन करणे.

2. सर्व फोन कॉल्स हाताळणे आणि इंटरनेट व फॅक्सद्वारे आलेला पत्रव्यवहार सांभाळणे.

3. आयटी खात्यासाठी मुख्य अधिकारी व संकेतस्थळाच्या अद्ययावतीकरणाचे काम.

4. स्टाफचा वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर) हाताळणे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना वेळोवेळी सीआर रिपोर्ट सादर करणे.

5. सर्व प्रकारच्या बैठका आयोजित करणे व त्यांची नोंद ठेवणे.

6. राजपत्रित व अराजपत्रित अधिकार्‍यांच्या दौर्‍यांचे व्यवहार हाताळणे.

7. दक्षता अधिकार्‍यांना सहाय्य करणे.

8. वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोपविलेले इतर कोणतेही कार्य. 

 

13.

 

कनिष्ठ लिपिक

1. मुख्य कारकुनाच्या मार्गर्शनाखाली सर्व प्रशासकीय बाबी

2. लेखापालाच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागीशी संबंधित सर्व पत्रव्यवहार

3. विधानसभेचे प्रश्न (एलएक्यू) /राज्यसभेचे प्रश्न (आरएसक्यू) /लोकसभेचे प्रश्न (एलएसक्यू) इत्यादी प्रश्नांची उत्तरे तयार करणे.

4. ईसीएससह सर्व प्रकारची एफविसी बिले, जीआयए बिले तयार करणे आणि लेखापालाच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागातर्फे ठेवण्यात येणाऱ्या संबंधित नोंदवहीमध्ये त्यांची नोंद करणे.

5. आवक आणि जावक संबंधी बाबी, एफएमएस, गार्डफाईल, डाकचे वितरण, पत्रे, इत्यादी.

6. बिले तयार करणे, स्टॅम्प अकांऊंट, नोंदवही आणि स्टॅम्प बीलसह जाहीरातीशी संबंधित बाबी.

7. कार्यालयाच्या आवाराची देखरेख, स्वच्छता राखणे.

8. खात्याला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या पुस्तकांची खरेदी, पुस्तक नोंदवही पाहणे आणि वाचनालयातील पुस्तकांची पडताळणी करणे.

9. उच्च अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली इतर कोणतीही कामे.

 

14

 

वाहन चालक

1.  कार्यालयाच्या गाडीची देखरेख करणे

2. लॉगबुक ठेवणे

3. शिपायाच्या अनुपस्थितीमध्ये तातडीच्या पत्रांचे वितरण करणे.

4. उच्च अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली कोणतीही इतर कामे.

 

15

 

शिपाई

1.  सकाळी 9.15 कार्यालय उघडणे आणि संध्या. 5.45 वा. बंद करणे.

2. आवश्यकतेनुसार संचालकांकडे जाणे.

3. कार्यालयातील फर्निचर योग्य जागी व स्वच्छ ठेवणे.

4. सर्व बाहेरील खात्यांमध्ये पत्रे पोहोचविणे आणि राजभाषा संचालनालयाच्या कार्यालयातील संबंधित डिलींग हॅण्डकडे डाक/कार्यालयीन नोंदवही पोहोचविणे.

5. सर्व डिलींग हॅण्डनी दिलेले काम करणे.

6. उच्चअधिकाऱ्यांनी नेमून दिलेली कोणतीही इतर कामे.